Pawar vs Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंड करुन वेगळी चूल मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील तीसहून अधिक आमदारांचा (NCP MLA) अजित पवार यांना पाठिंबा असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात येतंय. आता अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना आणखी एक धक्का दिलाय. शरद पवार यांच्याबरोबर असलेल्या आणखी सात आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिलं आहे. शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. नागालँडमधील (Nagaland) राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र जारी केलं आहे. प्रदेश कार्यकारणी आणि जिल्हाधक्षांची चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात नागालँडमध्ये पक्षाला मजबूत करण्याचा निश्चय केला असल्याचं या पत्रात नमुद करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागालँडचे सात आमदार
नागालँडमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक पार पाडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आले. नामरी नचांग, पिक्टो, एस. तोइहो येप्थो, वाय. म्होंबेमो हूमत्सो, वाय. मानखा ओकोन्याक, ए पोंगशी फोम आणि पी लॉन्गॉन यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत नँशनल डेमाँक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीला सर्वाधिक 25 जागा मिळाल्या तर भाजपाने 12 जागा पटकावल्या. या दोन पक्षांनी मिळून नागालँडमध्ये सरकार स्थापन केलं. त्यांना नागालँडमधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिला, यात राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. 


नागालँडचे प्रदेशाध्यक्ष वान्युंग ओडिओ यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी दिली. या भेटीत वान्युंग ओडिओ यांनी सात आमदारांसह पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र त्यांना सुपुर्द केली. 



अजित पवार गटाचं खातेवाटप
अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्या नऊ आमदारांनी मंत्रीमंडळात संधी देण्यात आली. पण मंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल 12 दिवसांनी खातेवाटप जाहीर झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुन्हा एकदा अर्थमंत्रीपद देण्यात आलं. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसनं अर्थ आणि सहकारसह महत्त्वाची खाती पदरात पाडून घेतली. भाजपकडील (BJP) 6 तर शिवसेनेकडील (Shivsena) 3 खाती राष्ट्रवादीच्या पदरात पडली आहेत.  खातेवाटपानुसार शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांचं कृषी खातं काढून ते धनंजय मुंडे यांना देण्यात आलं.